संस्थापकाचे मत
भारतीय शेती अधिक शाश्वत, नफ्याची आणि तंत्रज्ञानावर आधारित व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धती आणि AI आधारित उपायांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
“शेतकरी किडा” हे एक डिजिटल माध्यम आहे, जे शेतकऱ्यांना मोफत तांत्रिक मार्गदर्शन आणि पिकानुसार सविस्तर माहिती उपलब्ध करून देते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कीड व्यवस्थापन, सेंद्रिय व रासायनिक शेतीचे योग्य संतुलन, तसेच बाजारपेठेची माहिती यांद्वारे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि नफा मिळवण्यासाठी मदत करणे हा आमचा उद्देश आहे. आम्ही शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती आणि शाश्वत शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करून त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो.”

